वैभववाडीतील मिसळ महोत्सवाला मोठा प्रतिसाद…

2

नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; खवय्यांची  गर्दी..

वैभववाडी/पंकज मोरे.ता,०८: मिसळ हा अनेक खवय्यांचा आवडीचा पदार्थ विशेषतः कोल्हापूर मिसळ म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चरचरीत आणि चटकदार अशा मिसळच्या अनेक नमुन्यांची एकत्रित पर्वणी घेऊन आलेल्या मिसळ महोत्सवाला शनिवारपासून सुरूवात झाली.
येथील बाजारपेठेतील दूर्गामाता पटांगणावर हा महोत्सव भरविण्यात आला आहे. या मिसळ महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, जि. प. महिला बालकल्याण सभापती सौ. बांदेकर, बांधकाम सभापती रविंद्र जठार, समाजकल्याण सभापती शारदा कांबाळे, सुधीर नकाशे, तालुकाध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, कणकवली सभापती दिलीप तळेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष श्री नाणचे, कणखवली नगराध्यक्ष समिर नलावडे, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, संजय चव्हाण, दिलीप रावराणे, रविंद्र रावराणे, महिला तालुकाध्यक्षा भारती रावराणे, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, सज्जन रावराणे, संजय सावंत, संतोष पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, हर्षदा हरयाण, संतोष कानडे, राजन चिके यांच्यासह सर्व नगरसेवक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी खवय्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. या ठिकाणी विविध शहरातील २४ स्टॉल मिसळीचे उपलब्ध आहेत. त्यामुळे खवय्यांनी वेगवेगळ्या चवींचा आस्वाद घेण्याची संधी देखील आहे. मुंबई, कोल्हापूर, नाशिक, यांच्यासह इतर ठिकाणी मिळणाऱ्या नामवंत मिसळींचे नमुने ग्राहकांना तृप्त करणारे आहेत.
सुट्टीच्या दिवशी मिसळ महोत्सवाचे आयोजन केल्यामुळे या महोत्सवाला लोकांचा सुसाट प्रतिसाद मिळत आहे. तर या चविष्ठ मिसळ महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी मोठी गर्दी केली आहे.

29

4