ओटवणे चोरी प्रकरणी प्रकाश पाटील पुन्हा पोलिसांच्या ताब्यात…

2

न्यायालयात हजर; १ दिवसाची पोलिस कोठडी…

सावंतवाडी ता.०८: घरफोडी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला मुख्य संशयित प्रकाश पाटील रा.गोवा याला आज सावंतवाडी पोलिसांनी ओटवणे येथील चोरी प्रकरणात पुन्हा ताब्यात घेऊन,येथील न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हा गुन्हा दोन महिन्यापूर्वी घडला होता.याबाबतची फिर्याद लक्ष्मीकांत ओटवणेकर (रा.मांडवपाथरवाडी) यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली होती.या चोरी प्रकरणात सुमारे १ लाख ४७ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता.यातील ४५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान याबाबत अधिक तपासासाठी ही पोलीस कोठडी देण्यात आली,अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली.
येथील घरफोडी प्रकरणात संबंधित संशयिताला सावंतवाडी पोलिसांनी ५ फेब्रुवारीला ताब्यात घेतले होते.दरम्यान त्याला खासकिलवाडा येथील भक्ती भरत गवस घरफोडी प्रकरणात न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.दरम्यान काल त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपताच त्याला पुन्हा ओटवणे येथील अर्चना म्हापसेकर चोरी प्रकरणात न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.दरम्यान त्याला आज पुन्हा ओटवणे येथील श्री.ओटवणेकर घरफोडी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता ही पोलीस कोठडी देण्यात आली आहे.अन्य गुन्ह्यांच्या तपासासाठी उद्या त्याला पुन्हा येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.असेही श्री.सय्यद यांनी सांगितले.

2

4