नरडवे धरणग्रस्त पुन्हा लढा उभारणार…

2

नरडवे येथे प्रकल्‍पग्रस्तांची बैठक : प्रकल्‍पग्रस्तांच्या समस्या जैसे थे

कणकवली, ता.०८: नरडवे महंमदवाडी धरण प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचा समस्या जैसे थे आहेत. शासकीय पातळीवर केवळ टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांचे प्रश्‍न सुटेपर्यंत पुन्हा लढा उभारण्याचा निर्णय आज नरडवे प्रकल्पग्रस्तांनी घेतला.
नरडवे धरणप्रकल्पस्थळी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली धरणप्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. यात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सुटेपर्यंत लढा उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख आनंद आचरेकर, धरणग्रस्त संघटनेचे सुरेश ढवळ, मारुती ढवळ, गणेश ढवळ, प्रभाकर ढवळ, प्रकाश सावंत, मधुकर पालव, लुईस डिसोझा, महेश कदम, सतीश परब, अजय नार्वेकर, सत्यवान कोळगे, रमेश जाधव, अशोक जाधव, मधुकर शिंदे, चंद्रकांत नार्वेकर, दिनेश ढवळ, चंद्रकांत कदम उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांच्यावतीने गणेश ढवळ यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. यामध्ये वनसंज्ञातील क्षेत्रातील 34 हेक्टर जमीनी मधील घरे, गोठे, मांगर, फळ झाडे जमीन व अन्य मालमत्ता संपादित करून भूसंपादन अधिग्रहण कायदा 2013 च्या बाजारभावाने मोबदला मिळायला हवा. पुनर्वसन क्षेत्रात 1999 मध्ये 967 कुटुंबांना भूखंड वाटप करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र आता स्वतंत्र कुटुंबे वाढली आहेत. त्यामुळे नवीन रजिस्टर तयार होऊन त्या नुसार भूखंड वाटप व्हावे. सर्व धरणग्रस्त प्रमुख्याने शेतकरी असून त्यांच्या उदरनिवाह शेती हाच असल्याने पर्यायी शेतजमीनी मिळाव्यात. प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे किंवा एक रक्कमी 10 लाख मोबदला देण्यात यावा.
श्री.पारकर यांनी प्रकल्पग्रस्तांवर पोलिस फौंज फाट्याचा वापर करून जर दंडेलशाही होत असेल तर या विरोधात ग्रामस्थांच्या बाजूने शिवसेना निश्‍चितपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
—————

18

4