रात्रीस खेळ चाले टीमच्या “स्पॉट दादा”चे हृदयविकाराने निधन

2

 

सावंतवाडी
रात्रीस खेळ चाले टीमच्या “स्पॉट दादा”चे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
त्याला अधिक उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
ओम सिंग रा. आग्रा वय 32 असे त्याचे नाव आहे.दरम्यान आज दुपारी त्याचा मृतदेह विमानाने आग्रा येथे नेण्यात येणार असल्याचे टीमच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खाजगी रुग्णालयात सर्व कलाकारांनी गर्दी केली होती.

3

4