सावंतवाडी
भरधाव वेगाने जाणाऱ्या इको कारने चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनींना उडवल्याचा प्रकार आज येथे घडला यात एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
ही घटना आज सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानकासमोर घडली.
कीर्ती वासुदेव सावंत रा कोलगाव,भोमवाडी वय 20 असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुली शहरातील एका महाविद्यालयात क्लाससाठी आल्या होत्या.तेथून परतत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या इको कारने त्यांना धडक दिली. या चौघेही मुली खाली पडल्या मात्र सावंत हिला गंभीर जखम झाली आहे. तिला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठवण्यात येणार आहे असे मसुरकर यांनी सांगितले त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अभिजीत चितारी यांनी उपचार केले
इको कारने चार विद्यार्थ्यांनींना उडवले एक जखमी
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES