Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआमदार चषक एकांकिका स्पर्धेत सिंधुदुर्ग महाविद्यालयाची 'निर्वासित' एकांकिका प्रथम...

आमदार चषक एकांकिका स्पर्धेत सिंधुदुर्ग महाविद्यालयाची ‘निर्वासित’ एकांकिका प्रथम…

भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाची ‘कुरुक्षेत्र’ द्वितीय ; महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद…

मालवण, ता. ९ : आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून येथे घेण्यात आलेल्या आमदार चषक युवा महोत्सवातील एकांकिका स्पर्धेत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या ‘निर्वासित’ एकांकिकेने प्रथम तर भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘कुरुक्षेत्र’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक मिळविला. दोन्ही विजेत्या संघाना रोख पारितोषिक, चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात आमदार चषक युवा महोत्सव पार पडला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल रात्री उशिरा झाला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, राजू मानकर, मंदार शिरसाट, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, तपस्वी मयेकर, शिल्पा खोत, पूनम चव्हाण, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, अमित खोत, भूषण मेतर, आप्पा मालंडकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा उर्वरित निकाल असा- एकांकिका- तृतीय- एक मी, एक तू (व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ), पुरुष अभिनय- प्रथम- वैभव वळंजू (निर्वासित, सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण), द्वितीय- वरुण ठाकूर (एक मी, एक तू- व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ), तृतीय- अनिकेत चोपडेकर (ब्रेन-आचरा कॉलेज), उत्तेजनार्थ- किरण करवडकर (निर्वासित, सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण), स्त्री अभिनय- प्रथम- जान्हवी बिरमोळे (निर्वासित,सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण), द्वितीय- प्रणिता कोटकर (एक मी एक तू, व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ), तृतीय- नेहा चव्हाण (निर्वासित, सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण), उत्तेजनार्थ- मिताली आचरेकर (ब्रेन, आचरा कॉलेज), नेपथ्य- प्रथम- देवेन कोळंबकर (निर्वासित, सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण), द्वितीय- अजय आळवे (ब्रेन- आचरा कॉलेज), तृतीय- कुणाल मालवणकर (कुरुक्षेत्र, भंडारी कनिष्ठ महाविद्यालय मालवण), पार्श्वसंगीत- प्रथम- पंकज गावडे (निर्वासित, स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण ), द्वितीय- प्रतीक मालवणकर (कुरुक्षेत्र, भंडारी महाविद्यालय मालवण), तृतीय-शैलेश नाईक, शामली गावडे (एम मी एक तू आणि, व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ), प्रकाश योजना- प्रथम- सत्येंद्र दळवी (निर्वासित, सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण), द्वितीय- कुलराज बांदेकर (कुरुक्षेत्र- भंडारी कनिष्ठ महाविद्यालय मालवण), लक्षवेधी कलाकार – चिन्मय गवंडी (कुरुक्षेत्र- भंडारी कनिष्ठ महाविद्यालय मालवण). या एकांकिका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शरद सावंत, राजेश शिंदे, समृद्धी आसोलकर यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments