वेंगुर्लेत भंडारी समाज वधुवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

2

सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे, बेंगलोर, गोवा येथील सुमारे ३०० वधू-वरांनी घेतला मेळाव्यात सहभाग

वेंगुर्ले.ता.९: 
आजकाल फेसबुक, व्हाट्सअपच्या माध्यमातून तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात व लग्न करतात. मात्र अशी लग्न जास्त काळ टिकत नाहित. त्यामुळे तरुण तरुणींनी फेसबुक, व्हाट्सअपच्या मोहजालात न अडकता अशा प्रकारच्या वधु वर मेळाव्याच्या माध्यमातून लग्ने जमवावीत व लग्नात अनाठायी होणारा खर्च टाळावा असे प्रतिपादन उद्योजक तसेच समाजसेवक यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यानी केले. मुंबई, पुणे, बेंगलोर, गोवा, सिंधुदुर्ग येथील सुमारे ३०० वधू-वरांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. मेळाव्यास जवळपास एक हजार पेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित होते.
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लेतर्फे येथील साई दरबार हॉल येथे भंडारीज्ञातीचा थेट-भेट वधुवर मेळावा प्रथितयश काजु उद्योजक व महाराष्ट्र क्याशु मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक बाप्पा मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी, अतुल बंगे, उद्योजक आशिष शिरोडकर, ट्रक मालक संघटना रेडी चे अध्यक्ष गुणाजी मांजरेकर, भंडारी समाज एक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले चे अध्यक्ष रमण वायंगणकर, उपाध्यक्ष चंद्रकांत गडेकर, ऍड. श्याम गोडकर, खजिनदार सचिन परुळकर, सरचिटणिस विकास वैध्य, डॉ. प्रा. आनंद बांदेकर, जयराम वायंगणकर, सचिन गडेकर, जिल्हा सरचिटणिस राजु गवंडे, कुडाळ तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगुळकर, मंडळाचे माजी पदाधिकारी रमण किनळेकर, अशोक गवंडे, सत्यवान पेडणेकर, नगरसेवक धर्मराज कांबळी, तसेच सुभाष सातार्डेकर, मामा माडये, अरविंद वराडकर, रमेश नार्वेकर, सारिका काळसेकर, गुरुदास तीरोडकर, श्रीकृष्ण पेडणेकर, ऍड. प्रकाश बोवलेकर, सुरेश धुरी, सत्यवान साटेलकर, वगैरे मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी सुरेश बोवलेकर यानी मार्गदर्शन केले. मेळाव्याचे प्रास्ताविक रमण वायंगणकर यांनी तर सुत्रसंचलन डॉ. प्रा. आनंद बांदेकर यांनी केले.

6

4