कोंडुरा येथील मतिमंद विद्यालयाला जीवनाश्यक वस्तूची भेट…

2

गोव्यातील कोकण स्टार ग्रुपचा पुढाकार;ग्लॅनमार्क कंपनीतील युवक…

बांदा.ता,०९:  कोलवाळ-गोवा येथील ग्लॅनमार्क फार्मा कंपनीच्या कोकण स्टार ग्रुपने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत कोंडुरा येथील माऊली मतिमंद विद्यालयाला भेट देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व आर्थिक सहकार्य केले.
गोव्यात असलेल्या ग्लॅनमार्क कंपनीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक-युवती काम करत आहेत. त्यांनी एकत्र येत कोकण स्टार ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपअंतर्गत अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.
यावेळी शाळेला धान्य वाटप केले. तसेच मुलांना खाऊचे वाटप करत शाळेला आर्थिक सहकार्य केले. यावेळी कोकण स्टार ग्रुपच्या सदस्यांनी या मुलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुढील भेटीत भरीव आर्थिक सहकार्य करण्याची ग्वाही या ग्रुपने प्रशालेला दिली.
कंपनीचे अधिकारी दत्ताराम गोडकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गणेश धुरी, विठ्ठल बोन्द्रे, सोवींद्र पिंगुळकर, गौरव मोरजकर, रामचंद्र दळवी, तुकाराम परब आदी उपस्थित होते.

2

4