संत रोहिदासांच्या दोह्यांचे चिंतन करण्याची पीडित समाजाला गरज…

2

महेश परुळेकर; संत रोहिदासांच्या जयंती उत्सव कार्यक्रमात प्रतिपादन…

सावंतवाडी ता.०९:  संत शिरोमणी रोहिदासांच्या दोह्याचे चिंतन करण्याची गरज सर्व पीडित समाजाबरोबर लोकप्रतिनिधींना सुद्धा आहे.समाजातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडल्यास त्यातून निश्चितच समाज प्रबोधन आणि समाजात मोठा बदल होईल,असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी आज येथे व्यक्त केला.येथील संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित संत शिरोमणी रोहिदास यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमा प्रसंगी श्री.परुळेकर बोलत होते.
यावेळी संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी वाडकर,सावंतवाडी नगर परिषदेच्या मागास कल्याण सभापती माधुरी वाडकर,कास्ट्राईब संघटनेचे गुंडू चव्हाण,वसुंधरा चव्हाण,नरेश कारिवडेकर,राजकुमार चव्हाण,पतसंस्थेचे सचिव तथा कार्यकारी अधिकारी सदानंद चव्हाण, पतसंस्थेचे संचालक महादेव कलंबिस्तकर,मधुरिका चव्हाण खादी ग्रामोद्योगच्या माजी संचालिका अनिता कारिवडेकर ,सुरेश चव्हाण ,राधा तळवडेकर बाळकृष्ण सुमिया ,मेेहत्तर सागर तळवडेकर आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना परुळेकर म्हणाले,एन आर सी चा आधार घेत हे सरकार जातीच्या व्यवस्थेला खत-पाणी घालत आहेत.त्यामुळे दलित पीडित समाजाने सावध राहिले पाहिजे ,या समाजाला संत रोहिदास यांनी केलेले समाज प्रबोधनाचे कार्य तसेच केलेल्या प्रचार आणि प्रसाराचे काम पाहता त्यांच्या विचारांचा जागर होण्याची गरज त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी बोलताना पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी वाडकर म्हणाले संत रोहिदास यांनी सोळाव्या शतकात मोगलांच्या साम्राज्यावर हिंदू म्हणून झालेल्या अत्याचार धर्मांतरावर आपल्या काव्यातून प्रहार केला मोगल साम्राज्य ‘लोदी’च्या जुलमी अत्याचाराविरोधात यांनी विद्रोही कवी म्हणून प्रहार केला हिंदूंची देवालय पाडली जात असताना संत रोहिदास यांनी समाज जागृती केली शिक्षणासाठी प्रयत्न केले कीर्तनातून त्यांनी दिशा देण्याचे काम केले अशा या महान राष्ट्रीय संताने समाजाला मुख्य प्रवाहात सामील करण्याचे काम केलेले आहे आजही आपल्या समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही त्यामुळे समाज बांधवांनी संघटित होऊन जागृत राहण्याची गरज यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले
सुरुवातीला संत रविदास यांच्या जयंतीला दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी वाडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले तर संत रविदास यांच्या प्रतिमेला वंचित बहुजन आघाडीचे परूळेकर यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी कास्ट्राईब संघटनेचे नरेश कारिवडेकर यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक पतसंस्थेचे सचिव तथा कार्यकारी अधिकारी सदानंद चव्हाण यांनी केले

3

4