गांधील माशांच्या हल्ल्यात महाविद्यालयीन युवक जखमी…

2

मडुरा येथील घटना;बांदा आरोग्य केंद्रात अधिक उपचार सुरू

बांदा.ता,०९: 
मडुरा-डिगवाडी येथील महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतीक प्रकाश वालावलकर (वय २०) याच्यावर काजू बागायतीत गांधील हल्ला केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. सुमारे ५० हून अधिक माशांनी प्रतिकच्या शरीरावर ठिकठिकाणी चावा घेतला. त्याच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रतीक हा काजू बागायतीत कामगारांना आणण्यासाठी जात होता. त्यावेळी अचानक त्याच्यावर गांझील माशांनी हल्ला केला. यामध्ये त्याच्या हाताला, पायाला व चेहेऱ्यावर माशांनी चावा घेतला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली.
त्याला तात्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी उपचार केलेत.

8

4