बांदा नाबर इंग्लिश स्कूलचा १३ फेब्रुवारीला वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा…

2

बांदा.ता,१०: 
कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत गुरुवार दिनांक १३ रोजी सकाळी साडेदहा वाजता वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरपंच अक्रम खान, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, माजी सरपंच मंदार कल्याणकर, संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्ष अमृता महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी केले आहे.

2

4