बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थी नैतिकचा वाढदिवसादिनी अनोखा उपक्रम…

2

खाऊच्या पैशातून वर्ग मित्रांना दिली पुस्तकांची भेट…

बांदा.ता,१०:  जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या नैतिक निलेश मोरजकर या विद्यार्थीने आपल्या वाढदिवशी आपल्या वर्गमित्रांना गोष्टीची पुस्तके भेट दिली.
मोरजकर कुटुंबियांनी नैतिक याचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून नैतिकने साठविललेल्या खाऊच्या पैशातून शाळेतील वर्गमित्रांना गोष्टीची पुस्तके व खेळाचे साहित्य वाटप केले.
यावेळी नैतिकला सरपंच अक्रम खान, शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज नाईक, वर्गशिक्षक जे. डी. पाटील व शिक्षकवर्ग यांनी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्याच्या स्तुत्य उपक्रममाचे कौतुक केले. नैतिकला वर्गमित्रांनी शुभेच्छाकार्ड देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

22

4