सावंतवाडी पत्रकार संघाचा १४ फेब्रुवारीला पुरस्कार वितरण सोहळा…

2

सावंतवाडी ता.१०:  येथील तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ३:०० वाजता येथील जिमखानामैदान-बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विनायक राऊत ,उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत,माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर ,नगराध्यक्ष संजू परब,जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी,उपनगराध्यक्षा सौ.अन्नपूर्णा कोरगावकर,सभापती सौ.मानसी धुरी, उपसभापती शितल राऊळ, मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, सौ उमा मुंढेकर, डॉ. उत्तम पाटील ,डॉ.प्रा. गणेश मर्गज आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी वैनतेयकार मे द शिरोडकर आदर्श पुरस्कार महादेव उर्फ काका भिसे,माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मटकर आदर्श पुरस्कार अरविंद शिरसाट,जीवनगौरव पुरस्कार अभिमन्यू लोंढे, स्व.त्रिं.अ. उर्फ बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार अर्जुन राणे, कै. चंदू वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार शुभम धुरी यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे,असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, सचिव अमोल टेंबकर , खजिनदार रामचंद्र कुडाळकर व कार्यकारिणीने केले आहे.

3

4