Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedमाजगाव नाला येथे फाॅर्चुनर कारला अपघात

माजगाव नाला येथे फाॅर्चुनर कारला अपघात

चालक मद्यधुंद अवस्थेत;अनेक वाहनांना धडक देवून पळताना घडला प्रकार…

सावंतवाडी ता.१०: मद्यधुंद अवस्थेत असलेल्या फॉर्च्यूनर चालकाने अनेक वाहनांना धडक देत गोव्याच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न केला.मात्र माजगाव नाला परिसरात त्याची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका गटारात कलंडल्यामुळे अपघातग्रस्त झाली.ही घटना आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास माजगाव नाला परिसरात घडली.दरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाला नागरिकांनी ताब्यात घेत यथेच्छ चोप दिला. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून चालक जखमी झाला असल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments