दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार…

2

भाजपला १५,काँग्रेसला १,तर अपक्ष भुईसपाट..

मुंबई ता.११: दिल्ली येथे झालेल्य विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपने बाजी मारली आहे.त्याठिकाणी ७० पैकी तब्बल ५४ जागांवर त्यांनी यश मिळवले आहे.तर दुसरीकडे 15 जागांवर भाजपला समाधान मानावे लागले आहे.दरम्यान काँग्रेसच्या वाट्याला फक्त एकचं जागा आली आहे.तर अपक्ष उमेदवाराला असलेल्यांना तेथील जनतेने नाकारले आहे.
दरम्यान आपला विजय निश्चित झाल्यानंतर त्याठिकाणी आपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार जल्लोष केला.दुसरीकडे आता पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर काँग्रेसच्या पारड्यात एकमेव जागा पडल्यामुळे आता काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

0

4