वेंगुर्ले ता.११: सह्याद्रीच्या कड्या कपारीत वास्तव्य करणारा धनगर समाज “चपई” नृत्य ही आपली पारंपारिक कला आजही जतन करून आहे. समाजाने पिढ्यान् पिढ्या जतन केलेली कला आजची तरूण पिढी जोपासताना दिसते. माझा सिंधुदुर्ग परळ-मुंबई या संस्थेने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनामध्ये वेंगुर्ले येथील धनगर समाज चपई नृत्य मंडळाने आपली कला पारंपारिक ढंगाने सादर करत नृत्याचा अविष्कार सादर केला.
आयोजकांनी मंडळाला नृत्य सादर करण्यासाठी खास निमंत्रित केले होते.पारंपारिक वेशभूषेत पारंपारिक वाद्यांसह सादर केलेल्या नृत्याला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फुर्त दाद दिली. या संमेलनात मंडळाचा सत्कार करण्यात आला. मंडळांचे कलाकार श्री.गुंडु धाकू शेळके, गंगाराम धाकू शेळके, राजेश रामचंद्र शेळके, बाबु विठू कोळेकर, रितेश बाबु कोळेकर, राऊजी बापू शेळके, विठू लक्ष्मण कोळेकर, लक्ष्मण विठू कोळेकर, प्रकाश रामा शेळके, संतोष रामा शेळके, विनय लक्ष्मण शेळके, राऊ मानो खरात, धोंडू भागो खरात, रमेश बापू शेळके इ. कलाकार सहभागी झाले होते.