सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना मातृशोक…

2

कणकवली, ता.११ :भिरवंडे-बिवणेवाडी येथील रहिवाशी श्रीमती जयश्री जगन्नाथ सावंत (78) यांचे मंगळवारी पहाटे कणकवलीतील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना प्रदिर्घ आजाराने निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी भिरवंडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयश्री सावंत या गेल्या काही महिन्यांपासून मधुमेहाने आजारी होत्या. आजारपणामुळे त्यांना महिन्याभरापूर्वी कणकवलीतील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यातच त्यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कणकवली-कलमठ येथील निवासस्थानी व तेथून भिरवंडे-बिवणेवाडी येथील निवासस्थानी नेण्यात आला. दुपारी 12 वा. च्या सुमारास भिरवंडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक, सहकार तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जयश्री सावंत यांच्या पश्‍चात मुलगा, सून, चार मुली, दीर, जावई, जाऊ, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे.

0

4