सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने लवकरच भव्य कृषी मेळावा…

2

राजेंद्र म्हापसेकर; शेतकऱ्यांना ऊस शेतीकडे वळण्यासाठी मार्गदर्शन…

ओरोस ता,११: जिल्ह्यात ऊस उत्पादन वाढत आहे. हे सिंधुदुर्गच्या शेती विकासाच्या दृष्टीने फायद्याचे आहे. ऊस शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांना ऊस शेतीबाबत मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कृषि विभागाच्यावतीने लवकरच भव्य कृषि मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पीक तज्ञ मार्गदर्शक बोलाविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषि समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी मंगळवारी झालेल्या कृषि समितीच्या मासिक सभेत दिली.
जिल्हा परिषदेच्या बॅ नाथ पै सभागृहात म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेला प्रभारी कृषि अधिकारी विनायक ठाकुर, सदस्य सायली सावंत, अमरसेन सावंत, सुधीर नकाशे, अक्षता डाफळे, नूतन आईर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. म्हापसेकर यांची पदभार घेतल्यानंतर पहिलीच मासिक सभा असल्याने सदस्य व प्रशासन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.

3

4