अखेर सागरतीर्थ समुद्रात बुडालेल्या “त्या” युवकांचा मृतदेह आढळला

2

वेंगुर्ले ता.११: टांक-सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर बुडालेल्या दाभोलीतील युवकाचा मृतदेह अखेर मोचेमाड किनारपट्टीवर आढळला आहे. ही घटना आज १२:३० वाजण्याच्या सुमारास तेथील ग्रामस्थ व तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांसमोर उघडकीस आली.केतन मोहन सातार्डेकर (२५),असे त्याचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी नागरिकांसह केतनच्या मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली आहे.याबाबतची माहिती तटरक्षक दलाचे कर्मचारी संजय राणे,अनिरुद्ध पेडणेकर ,अमेय आरोलकर, वैभव सोंसुरकर आदींसह ग्रामस्थ राजन खवणेकर यांनी वेंगुर्ले पोलिसांना दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना पाच सायंकाळच्या सुमारास घडली होती.दरम्यान तेथील ग्रामस्थांकडून शोध मोहीम राबविण्यात आली होती.मात्र त्यात त्यांना अपयश आले.अखेर केतनचा मृतदेह मोचेमाड किनारपट्टीवर तेथील तट रक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना निदर्शनास आला. यावेळी किनाऱ्यावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

4

4