कसाल ग्रामपंचायतीच्या वतीने “एक दिवस शाळेसाठी” उपक्रम…

2

ओरोस ता.१२:  कसाल ग्राम पंचायतच्यावतीने ‘एक दिवस शाळेसाठी’ हा वार्षिक उपक्रम नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय सेवा बजावत असताना प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या शिक्षण, आरोग्य, अंगणवाडी, ग्राम पंचायत कर्मचारी, बचतगट प्रतिनिधी यांचा आदर्श कर्मचारी हा पुरस्कार देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
कसाल पंचायत समिती सदस्य तथा भाजप कुडाळ कुडाळ तालुकाध्यक्ष गोपाळ हरमलकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच संगीता परब, केंद्र प्रमुख आनंद धुत्रे, कसाल हायस्कूल मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर, ग्राम विकास अधिकारी सौ एस बी कोकरे, पोलिस पाटील अनंत कदम, सत्यवान परब यांसह कसाल मधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
गेली दोन वर्षे कसाल ग्रामपंचायतीचेवतीने ‘एक दिवस शाळेसाठी’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्त संगीत खुर्ची, रस्सीखेच, शालेय मुलांचे स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना व मुलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यानंतर कसाल ग्रामपंचायतीच्या वतीने यावर्षीचे विविध आदर्श पुरस्कार देण्यात आले. कसाल जनतेच्या हितासाठी बहुमोल योगदान दिल्याबद्दल यावर्षीचा आदर्श पुरस्कार कसाल केंद्रप्रमुख आनंद महादेव धुत्रे यांना देण्यात आला. तर धोंडी नारायण चव्हाण मुख्याध्यापक शाळा कसाल नंबर १ आणि सौ किरण बाळकृष्ण सावंत, शाळा कसाल बालमवाडी तसेच मारुती जनार्दन गोसावी शाळा कसाल बालमवाडी यांना या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशांत रवींद्र राणे ग्रामपंचायत लिपिक यांना कसाल ग्रामपंचायतीचा आदर्श कर्मचारी पुरस्कार बहाल करण्यात आला. सौ दीपा धनुराज बांदेकर यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार तर श्रीमती संगीता शिवराम मर्तल यांना आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार देण्यात आला. सौ उल्का उदय राणे यांना आदर्श आशा सेविका पुरस्कार देण्यात आला. तर सौ संजीवनी संतोष जगताप यांना बचत गट सीआरपी आदर्श बचत गट पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळालेल्या सर्वांना कसाल ग्रामपंचायतीचे वतीने शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गोपाळ हरमलकर, आनंद धुत्रे, गुरुदास कुसगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ग्रामविकास विकास अधिकारी सौ एस बी कोकरे यांनी केले.

6

4