Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याओरोस येथील श्री देव महापुरुषाचा प्राणप्रतिष्ठापना - कलशारोहण सोहळा...

ओरोस येथील श्री देव महापुरुषाचा प्राणप्रतिष्ठापना – कलशारोहण सोहळा…

ओरोस ता.१२: 
श्री देव महापुरुष कला व क्रीडा मित्रमंडळ आयोजित ओरोस खालची परबवाडी येथे 15 व 16 फेब्रुवारी रोजी श्री देव महापुरुषाची प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा. श्रींची मिरवणूक व आगमन सोहळा, 8 वा. गणेश पूजन व शांती होम, 9 वा. होमहवन व औदुंबर स्थापना, सायं. 7 वा डिगस येथील बुवा गौरेश चव्हाण यांचे सुस्वर साधना संगीत मंडळाचे भजन होणार आहे.
16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा. अभिषेख व होम हवन, कलश ध्वज स्थापना, सकाळी 11 वा. मूर्ती प्रतिष्ठापना दुपारी  ०१   महाआरती, 1.30 वा. महाप्रसाद, सायं. 6 वा. स्थानिक भजन, रात्रौ 9 वा. अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले यांचा ‘कूर्मदासाची वारी’ हा नात्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous article
Next article
स्वसंरक्षणासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी प्रशिक्षण घेणे गरजेचे… प्राचार्य डॉ. मंडले ; सिंधुदुर्ग महाविद्यालयात शक्ती सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण… मालवण, ता. १२ : महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षणाची अधिक आवश्यकता आहे. समाजात वावरताना पदोपदी धोके निर्माण झाले असून त्यावर मात करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी अशा प्रशिक्षणाचा लाभ घ्यायला हवा असे प्रतिपादन सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांनी येथे केले. समाजातील स्त्रियांवर होणारे वाढते अत्याचार, बलात्काराच्या अमानुष घटना, विनयभंगाच्या असंख्य घटना या सर्व गोष्टींना स्त्रियांनी समर्थपणे तोंड देण्यासाठी स्वसंरक्षणाची अत्यंत गरज निर्माण झाली आहे हे लक्षात घेऊन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात जिमखाना विभागाच्यावतीने शक्ती सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एक महिना कालावधीच्या या प्रशिक्षणाचा समारोप महाविद्यालयात झाला. यावेळी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. प्रशिक्षण समन्वयक डॉ. सुमेधा नाईक यांनी या प्रशिक्षणामागील भूमिका व आवश्यकता स्पष्ट केली. प्रशिक्षणार्थी स्वाती पारकर यांनी प्रशिक्षणाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षक वैभव वळंजू यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःचाच जीव वाचवण्यासाठी नव्हे तर इतरांचा जीव वाचवण्यासाठी देखील होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच या प्रकारचे विशेष प्रशिक्षण सिंधुदुर्ग महाविद्यालयात देण्यात आले आहे. याबाबत त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले. सर्व प्रशिक्षणार्थींनी जिद्दीने हा उपक्रम पूर्ण केला याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. या समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. शंकर खोबरे व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नाईक यांनी केले. प्रा. चौगले यांनी आभार मानले.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments