सावंतवाडी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग;युवकावर गुन्हा दाखल..

2

सावंतवाडी ता.१२: एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील एका युवकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली.गोविंद शंकर नाईक(२५) रा.आरोस दांडेली-वरचावाडा,असे त्या युवकाचे नाव आहे.याबाबतची तक्रार संबंधित युवतीने काल सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली होती.दरम्यान त्याला आज ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

संबंधित शाळकरी मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे,संशयित हा नेहमी माझा पाठलाग करत होता. हा प्रकार गेले सहा महिने सुरू होता.याबाबत आपण त्या युवकाला बजावले होते.मात्र त्याच्याकडून हा प्रकार कायम सुरू होता.दरम्यान काल सकाळी येथील भोसले उद्यानात आपण आले असता त्याठिकाणी येऊन त्याने आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
याबाबतची कल्पना तिने आपल्या पालकांना दिली.त्यानुसार त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.संबंधित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावर पॉस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आज त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

1

4