दहावीच्या मुलांनी खुद्द शिक्षकांना घातली “खाचकुली”…

2

शहरा लगतच्या शाळेतील घटना;रविवारी क्लास घेतल्याचा राग…

सावंतवाडी ता.१२: रविवारचा एक्सट्रा क्लास घेत असल्याच्या रागातून दहावीत शिकत असणाऱ्या पाच मुलांच्या ग्रुपने खुद्द शिक्षकांना खाचकुली घालून ठेवली.त्याचा त्रास दोन महीला शिक्षकांना झाला.ही घटना आज शहरा लगतच्या एका शाळेत घडली.दरम्यान हा प्रकार उघड झाल्यानंतर त्या पाचही विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची शाळेच्या प्रशासनाने कान उघाडणी केली.अखेर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.परंतु या प्रकाराची गावात जोरदार चर्चा सुरू होती.

संबंधित विद्यार्थी हे दहावीत शिक्षण घेत आहेत.त्यांचे शेवटचे वर्ष असल्यामुळे शाळेच्या शिक्षकांकडून रविवारी अतिरिक्त क्लास लावण्यात आले होते.मात्र त्या मुलांचा या गोष्टीसाठी विरोध होता.त्यामुळे रागातून आपण हा प्रकार केल्याचे त्यांचे म्हणणे असल्याचे एका शिक्षकाकडून सांगण्यात आले.

9

4