विद्यार्थ्यांनी घेतली ऐतिहासिक देवस्थानची माहिती…

2

वेंगुर्ला,ता.१२: ऐतिहासिक मंदिरांची रचना, स्थापना, भौगोलिक स्थान आदींचा अभ्यास करण्यासाठी प्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख डॉ.विलास देऊलकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅ.खर्डेकर कॉलेजच्या इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी येथील प्रसिद्ध श्री मानसीश्वर देवस्थानला भेट दिली.

यावेळी विरेंद्र देसाई, व्ही.एस.चव्हाण, एल.बी.नैताम, व्ही.ए.पवार, बी.जी.गायकवाड आदी उपस्थित होते. श्री मानसीश्वर देवस्थान हे एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. उपस्थित विद्यार्थ्यांना प्राचार्य देऊलकर यांनी या देवस्थानची रचना, इतिहास, भौगोलिक स्थान आदींची माहिती दिली.

5

4