2

झाराप येथील घटना; प्रकरण पोलिस ठाण्यात,संशयिताला समजत…

कुडाळ/विवेक गावडे ता.१३: एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार आज सकाळी झाराप तिठा परिसरात घडला.संबंधित मुलगी ही विजयदुर्ग-सावंतवाडी या बसमधून प्रवास करत होती.या प्रकरणात संशयित असलेला कर्मचारी एसटीशी संबधित असल्याचे समजते.दरम्यान झालेल्या प्रकाराबाबत संबंधित शाळकरी मुलीने तक्रार देण्यास असमर्थता दर्शविली.त्यामुळे त्या संशयिताला पोलिस ठाण्यात बसवून ठेवले आहे,अशी माहिती ठाणे अंमलदार श्री.अरवारी
यांनी दिली.
हा प्रकार झाल्यानंतर चालक व वाहकाने एसटी घेऊन थेट
कुडाळ पोलिस ठाणे गाठले.झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.मात्र त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या संबंधित मुलीच्या गावातील गावकरी व घरातील नातेवाईकांनी तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे याबाबत कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात नाही,असे यावेळी अरवारी यानी सांगितले.

 

1

4