Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघे ताब्यात...

दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघे ताब्यात…

उत्पादन शुल्कची कारवाई; पाच लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बांदा.ता,१४:  गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने मोटारीतून बेकायदा नेण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या डमरू वाहतुकीवर कारवाई करत एकूण ५ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघा सबशयितांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुलि तपासणी नाका पथकाने बांदा-दाणोली रस्त्यावर ओटवणे येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने मोटारीतून गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची खबर पथकाला मिळाली होती. त्यानुसार अबकारी खात्याचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एच. चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत कदम, जवान रमेश चंदुरे, शरद साळुंखे, संदीप कदम यांच्या पथकाने बांदा-दाणोली मार्गावर ओटवणे फाटा येथे सापळा रचला.
रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बांद्याहुन आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या फियाट मोटारीला (एमएच ०९ डीएक्स ३२७५) तपासणीसाठी थांबविण्यात आले. मोटारीच्या मागील डिकीत व मागील सीटवर गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे खोके विनापरवाना आढळून आले. पथकाने १ लाख १४ हजार रुपये किमतीची दारू व ४ लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण ५ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नितीन शशिकांत पोकळे (वय ४६, रा. करवीर, जि. कोल्हापूर) व विशाल रवींद्र वनकुंद्रे (वय ४७, रा. शाहूपुर, जि. कोल्हापूर) या संशयिताना ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास निरीक्षक एस. एच. चव्हाण करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments