Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्हा मिडिया पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी आबा खवणेकर...

जिल्हा मिडिया पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी आबा खवणेकर…

सचिवपदी कृष्णा सावंत;उपाध्यक्ष म्हणून समील जळवी,शिरीष नाईक यांची निवड….

कुडाळ,ता.१३: सिंधुदुर्ग जिल्हा मिडिया पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी आबा खवणेकर तर सचिवपदी कृष्णा सावंत यांची निवड करण्यात आली.संघटनेची बैठक नुकतीच माणगाव येथे टेंबे स्वामी मंदिरात पार पडली.यावेळी ही निवड करण्यात आली.यात उपाध्यक्षपदी समिल जळवी, शिरीष नाईक, खजिनदारपदी विष्णू धावडे, सहसचिवपदी भूषण सावंत आदींची निवड करण्यात आली.
तर सदस्य म्हणून रूपाली देसाई,सिद्धिका भांडये, स्नेहा मोरे, संतोष तांबे, अजय गडेकर, अनिकेत शृंगारे,अमिता मठकर, प्रमोद गवस, तुळशीदास नाईक,सुमित दळवी, लवू परब, गोविंद शिरसाट, गुरुनाथ आनंद कांडरकर आदी पत्रकार उपस्थित होते.यावेळी पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ही संघटना काम करणार आहे,असे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री.खवणेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments