पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा…

2

सिंधुदुर्गनगरी.ता,१३: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे उद्या दि.१४ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०.३० वा. पोलीस परेड ग्राऊंड, हेलिपॅड, ओरोस येथे आगमन व मोटारीने नवीन डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालयकडे प्रयाण, सकाळी १०.४५ वा. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, अधिक्षक अभियंता महावितरण, कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा, विभाग नियंत्रण राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी व संबंधित सर्व अधिकारी यांच्या समवेत मुख्यमंत्री महोदय यांचा दौरा व आंगणेवाडी यात्रा नियोजनासंदर्भात आढावा बैठक, दुपारी १.०० ते २.०० शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे राखीव, दुपारी २.०० वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी २.१५ वा. पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड, ओरोस, येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड, सावंतवाडी कडे प्रयाण, दुपारी २.३०वा. पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड, सावंतवाडी येथे आगमन व मोटारीने जिमखाना मैदान, सावंतवाडी कडे प्रयाण, दुपारी २.४५ वा. बॅडमिंटन हॉल, जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे सावंतवाडी तालुका पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती, दुपारी ३.३० वा. सावंतवाडी जिमखाना मैदान येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड, सावंतवाडी कडे प्रयाण, दुपारी ३.४० वा. पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड, सावंतवाडी येथून खाजगी हेलिकॉप्टरने जुहू हेलिपॅड, मुंबईकडे प्रयाण.

8

4