कारवारमधून पळालेली अल्पवयीन मुलगी कणकवलीत सापडली

2

कणकवली, ता.13 ः आई वडिलांशी भांडण करून कारवार येथून पळालेली अल्पवयीन मुुलगी आज शहरातील बांधकरवाडी दत्तमंदिर येथे आढळून आली. अधिक चौकशीसाठी स्थानिकांनी या युवतीला सायंकाळी कणकवली पोलिस ठाण्यात आले होते. पोलिस तिच्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत.
आज दुपारपासून शहरातील बांधकरवाडी दत्तमंदिर येथील मंदिरात एक युवती बसून राहिली होती. दुपारनंतर मंदिरात हरिपाठाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम संपला तरीही ही युवती तेथेच बसून राहिल्याने स्थानिकांना शंका आली. तिच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ती काहीच बोलत नसल्याने येथील महिलांनी तिला कणकवली पोलिस ठाण्यात आणले. तेथे अधिक चौकशीनंतर आई वडिलांशी भांडण झाल्याने त्या अल्पवयीन युवतीने कणकवली गाठल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या युवतीची मावशी देखील शहरात वास्तव्यात असल्याची बाब तिने पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिस त्या युवतीच्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत. तसेच युवतीच्या आई वडिलांशीही संपर्क साधला जात आहे.

3

4