कोल्हापुरात जिवंत मुलीला वाहिली श्रद्धांजली

2

पळून गेल्याच्या रागा वरून खुद्द कुटुंबीयांनीच लावले बॅनर

कोल्हापूर ता.१४:
पळून गेलेल्या मुलीबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी कोल्हापुरातील वडीलांकडुन आपल्या जिवंत मुलींना श्रद्धांजली वाहील्याचा बॅनर लावून निषेध केला आहे.
हा प्रकार उघड झाल्यानंतर गावात मात्र चर्चा आहे. त्या बॅनरवर मुलीला कशा पद्धतीने प्रेम दिले, तिचे कसे लाड पुरवले याची माहिती देण्यात आली आहे. तिच्या जन्मानंतर आईला संधिवात झाला असताना सुद्धा तुझे लाड पुरवले परंतु मोठी झाल्यानंतर कोणालाही न सांगता निघून गेली त्यामुळे तू आमच्याशी स्वर्गवासी झाली असे वडिलांचे म्हणणे आहे. अशाप्रकारचा प्रकार पुन्हा कुठच्याही मुलीने करून यासाठी आपण हा निषेध केला आहे असे त्या वडिलांचे म्हणणे आहे

0

4