वनमंत्र्यांची उपस्थिती; वन विश्रामगृहाच्या नुतनीकरणाचा शुभारंभ…
सावंतवाडी ता.१४: माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून आंबोली येथे उभ्या राहणाऱ्या फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन व शासकीय वन विश्राम गृहाचे नुतनीकरणाचा शुभारंभ आज वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होत आहे.हा कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता येथील आंबोली वन उद्यानात होणार आहे.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत,नारायण राणे,आमदार दीपक केसरकर,वैभव नाईक, नितेश राणे,मुख्य वनसंरक्षक,डॉ क्लेमेंट बेन,जिल्हाधिकारी,के.मंजूलक्ष्मी,सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक,समाधान चव्हाण,सहाय्यक उपवनसंरक्षक, इ.दा.जळगावकर,सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल,गजानन पानपट्टे, आंबोलीचे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन संयुक्त वनव्यवस्थापन समिती आंबोली व संयुक्त वनव्यवस्थापन समिती पारपोली यांनी केले आहे.