वेंगुर्ला.ता,१४:
शिरोडा वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा १७ वा वर्धापनदिन शनिवार १५ फेब्रुवारी रोजी असून त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लिंगेश्वर मंदिरात सकाळी ८ वाजता धार्मिक विधी, पूजा आर्चा आणि लघुरुद्र, सकाळी ९ वाजता वरदशंकर महापुजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, १२.३० ते ३ पर्यंत महाप्रसाद, संध्या. ५ ते ६ वा. नामस्मरण, ७ ते ८ भाविकांची भजने, रात्री ८ ते ९ “श्री.” ची पालखी, आणि रात्री १० वाजता अष्टविनायक दशावतार निरवडे यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन श्री. देव लिंगेश्वर मंदिर समितीने केले आहे.
*मंदिरात २१ फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सव*
या मंदिरात महाशिवरात्री उत्सव शुक्रवार २१ फेब्रुवारी २०२० मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्त सकाळी ८.३० वा धार्मिक विधी, अभिषेक, सायं. ४ वाजता कीर्तन, ६ वाजता भाविकांची भजने, रात्री ७ वाजता “श्री.” ची पालखी, ७.३० वाजता सत्कार समारंभ, आणि रात्री ८ वाजता दाभोली येथील गौतमेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या उत्सवातही सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.