मुख्यमंत्र्यांच्या मिनी कॅबिनेटचा फायदा सिंधुदुर्गला नक्कीच होईल…

2

उदय सामंत;दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचे विचार कायम तेवत ठेवले जातील

सावंतवाडी ता.१४: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ व १७ तारखेला राज्याची मिनी कॅबिनेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे.या कॅबिनेटमध्ये राज्याचे सचिव उपस्थित राहणार आहेत.तर अन्य वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सने जोडले जाणार आहेत.त्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील जनतेला नक्कीच होईल,असा विश्वास आज येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचे नेते तथा उच्चशिक्षण राज्यमंत्री उदय सामंत यांनी केले.दरम्यान दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या देशाला नव्हे तर जगाला विचार दिले,त्यामुळे त्यांच्या स्मृती कायम तेवत ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील,असेही त्यांनी सांगितले.सावंतवाडीत पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी श्री.सामंत बोलत होते.
यावेळी पत्रकार अरविंद शिरसाट,अभिमन्यू लोंढे,काका भिसे,शुभम धुरी,अर्जुन राणे यांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
यावेळी श्री.सामंत पुढे म्हणाले,जिल्ह्यात १६ व १७ तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिनी कॅबिनेट आयोजित करण्यात आलेली आहे.याचा फायदा जिल्ह्यातील विकासाला होणार आहे. त्यामुळेही मिनी कॅबिनेट येथील विकासाच्या केंद्र ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी या जिल्ह्याला मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या विचारांचा वारसा अवघ्या देशाने नव्हे तर जगाने स्वीकारला आहे.त्यामुळे त्यांच्या स्मृती कायम टिकाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.कॉलेजमध्ये त्यांचे तैलचित्र लावण्यासाठी आमचे प्रयत्न असतील मुख्यमंत्री ठाकरे यांचे सुद्धा तसे स्वप्न आहे .सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्काराचे कौतुक करावे तितके थोडे आहे.हा उपक्रम चांगला आहे याचा फायदा नवोदित तसेच जेष्ट पत्रकारांना नक्कीच होईल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार विनायक राऊत,मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे,उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर,ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर,हरिश्चंद्र पवार,संतोष सावंत,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई,सचिव अमोल टेंबकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर,पत्रकार शिवप्रसाद देसाई,मयुर चराठकर,रवी गावडे,अनिल भिसे,शैलेश मयेकर,सिद्धेश सावंत,सिद्धेश पुरलकर,भक्ती पावसकर,निखिल माळकर,अजय भाईप,योगिता बेळगावकर अनंत जाधव आदि पत्रकारांसह
डॉ.जयेंद्र परुळेकर,रुपेश राऊळ,बाबू कुडतरकर,अँड.शामराव सावंत,शब्बीर मणियार,चंद्रकांत कासार,कौस्तुभ पेडणेकर,मायकल डिसोजा,प्रमोद म्हाडगुत,लक्ष्मण नाईक,अपर्णा कोठावळे,रश्मी माळवदे,भारती मोरे आदी उपस्थित होते.

3

4