फुलपाखरू उदयानाचा फायदा आंबोली पर्यटनाला होईल…

2

वनमंत्री राठोड;आंबोलीतील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी करणार प्रयत्न…

आंबोली ता.१४: फुलपाखरू उद्यानाच्या माध्यमातून आंबोलीच्या पर्यटनात आणखी भर पडेल,त्याचा फायदा येथील स्थानिक लोकांना होईल,असा विश्वास राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान आंबोलीतील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाय योजना आम्ही करण्यासाठी प्रयत्न करत आहोत,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.राठोड यांच्या हस्ते आंबोली येथे चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या फुलपाखरू उद्यान आणि शासकीय विश्राम गृहाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार दीपक केसरकर,उपवनसंरक्षक समाधान चव्हाण,सहायक उपवनसंरक्षक सी.जळगावकर,वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव,सरपंच रोशनी पारधी,शशिकांत गावडे,उपसरपंच विलास गावडे,बबन गावडे,अरुण गावडे,काशीराम राऊत,जगन्नाथ गावडे,दीपक मेस्त्री,हेमंत ओगले,हेमंत नार्वेकर,नाना आवटे,काका पावसकर,वनविभागाचे अधिकारी सर्जेराव सोनवडेकर,अमृत शिंदे,दयानंद कोकरे, वनपाल वसंत चाळके,वनरक्षक पी.एन. प्रताप,दयानंद शिंदे,वनरक्षक मायनिकर,वनपाल आरेकर,बाळा गावडे,मंगेश सावंत,नामदेव गावडे,बाळा गावडे,एकनाथ गावडे,एकनाथ पारधी,अशोक गावडे आदी उपस्थित होते.
उद्यानासाठी ४२ लाख मंजूर असून त्यातील १९ लाख खर्च करण्यात आले.६ लाख वॉटर स्प्रिंकलिंग करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत.उर्वरित रक्कम मेंटेनन्स करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.असे यावेळी सांगण्यात आले.

11

4