जिल्ह्याच्या समन्वय व सनियंत्रण समिती पदी बंड्या घोगळे…

2

सिंधुदूर्ग.ता,१४: जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती अशासकीय सदस्यपदी कोलगांव ग्रा.प.सदस्य शिवदत्त उर्फ बंड्या घोगळे यांची निवड करण्यात आली.आज त्यांना पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनिधी म्हणून ह्या समितीचे अध्यक्ष खासदार विनायक राऊत यांच्या शिफारसीने कोलगांवचे ग्रा.प.सदस्य शिवदत्त घोगळे यांची नियुक्ती करण्यात आली.जि.प.सदस्य मायकल डिसोजा,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी खासदार राऊत यांच्याकडे विशेष शिफारस केली होती.या नियुक्त बद्दल शिवदत्त घोगळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

1

4