कणकवली, ता.१५ : कणकवली शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्ग दुतर्फा अतिक्रमण हटाव ची कारवाई आज नगरपंचायत आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. महामार्ग शाखा अभियंता गणेश महाजन आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्या उपस्थितीत महामार्ग दुतर्फा असलेले स्टॉल व इतर बांधकामे हटविली जात आहेत. अंगणवाडी आणि कुणकेश्वर यात्रा उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असल्याची माहिती महामार्ग आणि नगर पंचायतीच्या वतीने देण्यात आली.
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्विस रोड करून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. या सर्विस रोड लगत स्टॉल व विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही अतिक्रमणे हटविण्याबाबत नगरपंचायतीने येथील विक्रेत्यांना ताकीद दिली होती. मात्र अतिक्रमणे कायम राहिल्याने आज दुपारी अकरा वाजल्यापासून महामार्ग दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटविण्याची कारवाई नगरपंचायत आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरू केली आहे.
कणकवली महामार्ग दुतर्फा अतिक्रमण हटाव कारवाई…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES