न्हावेली येथे दोन दुचाकीत अपघात…

2

दोघे गंभीर; अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळीत हलविले…

सावंतवाडी ता.१५:  दोन दुचाकींची एकमेकांना धडक बसून झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले.तर एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.हा अपघात आज सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास न्हावेली-चौकेकरवाडी येथे घडला.महेश लवू चिंदरकर(३५) रा.शिरोडा व गौरी महादेव चौकेकर रा.न्हावेली,अशी गंभीर जखमींची नावे आहेत.तर लक्ष्मण बाबाजी नाईक(५०) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.दरम्यान जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.यातील गंभीर जखमींना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले.

7

4