वेंगुर्ला.ता,१५: शिरोडा वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा १७ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही उपस्थिती दर्शवून देवाचे दर्शन घेतले.
लिंगेश्वर मंदिरात आज सकाळी धार्मिक विधी, पूजा आर्चा आणि लघुरुद्र करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर वरदशंकर महापुजा व दुपारी आरती व तीर्थप्रसादासह महाप्रसाद कार्यक्रम झाला.
रात्री ८ ते ९ या वेळेत “श्री.” ची पालखी, आणि रात्री १० वाजता अष्टविनायक दशावतार निरवडे यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
दरम्यान सकाळ पासूनच भाविकांनी देवदर्शन साठी गर्दी केली होती. सायंकाळी आमदार दीपक केसरकर यांनीही उत्सवाला भेट दिली. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, माजी सरपंच विजय पडवळ, भाऊ आंदुर्लेकर, रविंद्र कांबळी, नंदू कांबळी, माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, बाबी पडवळ आनंद नाईक, प्रदीप भगत, आजू आमरे, राजन कांबळी, विजय शिरगावकर, तीरी पडवळ, भाई रेडकर, कमलाकर कांबळी, जनु पडवळ, पांडुरंग नाईक, तात्या हाडये, कौशिक परब, राहुल गावडे व रेडी सरपंच रामसिंग राणे, दाजी नाईक यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरोडा वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात साजरा…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES