मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १७ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात…

2

ओरोस ता.१५:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 17 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून 17 रोजी सायं. 5 वा. मिनी कॅबिनेटद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. 18 रोजी सकाळी 9 वा. रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. यावेळी पाच मंत्री व मुख्य सचिवांसह विविध विभागाचे सात सचिव उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री 17 रोजी प्रथम आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. 18 रोजी रत्नागिरी आढावा संपल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला पाहणी करणार आहेत. यानंतर चिपी विमानतळ येथे भेट देवून तेथे बैठक घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री दौऱ्याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना मंजुलक्ष्मी यांनी मुख्यमंत्री दौरा निश्चित आहे. ते दोन दिवस जिल्ह्यात असणार हे सुद्धा नक्की आहे. 17 रोजी सायंकाळी 5 वा सिंधुदुर्ग आढावा व 18 रोजी सकाळी 9 वा रत्नागिरी आढावा याची वेळ निश्चित झाली आहे. पण अन्य कार्यक्रम किती वाजता आहेत ? याचा सविस्तर दौरा अद्याप आलेला नाही.

7

4