अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग…

2

तालुक्यातील एका गावातील घटना ; संशयित आरोपी विरोधात पॉस्कोतंर्गत गुन्हा दाखल…

मालवण, ता. १५ : शहरालगतच्या एका गावात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सचिन संदीप वराडकर रा. वायरी भुतनाथ या तरूणाविरोधात येथील पोलिस ठाण्यात पॉस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार पीडीत शाळकरी मुलगी काही दिवसांपूर्वी एका शाळेत खिडकीची दारे लावत असताना संशयित आरोपीने तेथे जात तिचा विनयभंग केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडीत मुलगी रस्त्यावरून जात असताना वाटेत अडवित तिचा विनयभंग केला. याबाबतची माहिती पीडीत मुलगीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर आज तिच्या आई-वडीलांनी पोलिस ठाणे गाठत संशयित आरोपी सचिन वराडकर याच्याविरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी वराडकर याच्याविरोधात पॉस्कोतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. महिला पोलिस अधिकार्‍यामार्फत या प्रकरणाचा तपास केला जाणार असल्याची माहिती ठाणे अंमलदारांनी दिली.

7

4