Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याखास शिमगोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी गगनबावडा मुंबई एस. टी. बस ५ मार्च पासून सुरू...

खास शिमगोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी गगनबावडा मुंबई एस. टी. बस ५ मार्च पासून सुरू…

वैभववाडी,ता.१६:खास शिमगोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी गगनबावडा पाचल मार्गे परेल मुंबई व्हाया मांगवली पुनर्वसन गावठाण ही एस.टी.बस.दि.५ मार्च ते ९ मार्च दरम्यान सुरु करण्यात येत आहे.याचा लाभ या मार्गावरील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ नागप यांनी केले.
गगनबावडा पाचल मार्गे परेल मुंबई ही बस अनेक वर्षे नियमित सुरु होती.माञ गेल्या चार पाच वर्षात या बसला भारमान कमी होत असल्याचे कारण देत गगनबावडा डेपोने ही गाडी बंद केली आहे.गगनबावडा भुईबावडा, व पाचल दशक्रोशीतील गावातील प्रवाशांना ही सोयीची एस.टी.बस होती.माञ दिवसेंदिवस प्रवाशांचा खाजगी आराम बसकडे वाढत असलेल्या कलामुळे या बसला भारमान मिळत नसल्याचे कारण देत ही बस आता फक्त हंगामी सुरु करण्यात येते.ही बस सुरु करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ नागप हे नेहमीच प्रयत्न करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments