बांद्यात किटक नाशक प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू…

2

बांदा,ता.१६: खोकल्याचे औषध समजून चुकून झाडांवर फवारणी करण्यात येणारे कीटकनाशक प्राशन केल्याने अत्यवस्थ झालेल्या गुरुनाथ भरत बांदिवडेकर (वय ३८, रा. गाळेल-मधलीवडी) या तरुणाचे गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले.
गुरुनाथ याने गुरुवार दिनांक १३ रोजी खोकल्याचे औषध म्हणून कीटकनाशक प्राशन केले होते. त्याला त्रास जाणवू लागल्याने तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केलेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे पाठविण्यात आले. त्याच्यावर तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज सकाळी उपचारादरम्यान गुरुनाथ याचे दुःखद निधन झाले. त्याच्या मागे पत्नी, २ मुलगे असा परिवार आहे.

3

4