मुंबईतील पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू…

2

देवबाग येथील घटना…     

मालवण, ता. १६ : मुंबईहून देवबाग येथे पर्यटनासाठी आलेल्या विकास रामचंद्र नावंदीकर (वय-३५ रा. अंधेरी पूर्व) या तरुणाचा आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
आज पहाटे मुंबईतील १७ जणांचा ग्रुप पर्यटनासाठी देवबाग येथे आला होता. या ग्रुपमध्ये विकास नावंदीकर यांचाही समावेश होता. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान विकास हे आपल्या मित्रांसमवेत देवबाग किनार्‍यावर फिरायला गेले होते. परंतु त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने विकास हे हॉटेलच्या दिशेने परतले. याचवेळी त्यांना उलटी झाली आणि ते खाली कोसळले. त्यांच्या मित्रांनी व देवबाग ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ रुग्णवाहिकने रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी सुभाष शिवगण, विलास टेंबुलकर यांनी पंचनामा केला.

5

4