अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी संशयितास पोलिस कोठडी…

2

 

मालवण, ता. १६ : शहरालगतच्या एका गावातील अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी काल रात्री उशिरा अटक करण्यात आलेल्या सचिन संदीप वराडकर रा. वायरी भुतनाथ याला येथील न्यायालयात हजर केले असता १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी काल येथील पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सचिन वराडकर याच्या विरोधात पास्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. आज त्याला येथील न्यायालयात हजर केले असता १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक बी. जी. जगताप या करत आहेत.

1

4