वैभववाडी ता.१७: येथील महाराणा प्रतापसिंह प्रतिष्ठान आयोजित शिव जयंती उत्सवाचे औचित्य साधून दि. १८ व १९ फेब्रुवारी या कालावधीत भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संताजी रावराणे यांनी कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघ मर्यादित या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला शहीद मेजर कौतुभ रावराणे चषक व रोख ७०५४ रुपये, उपविजेत्या संघाला शहीद मेजर कौस्तुभ रावराणे चषक व रोख ४०५४ रुपये, तसेच उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट अष्टपैलू यांना रोख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा दुर्गामाता उत्सव पटांगणावर रात्री प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क ३०० रुपये रहाणार आहे. अधिक माहितीसाठी मधुकर पाटील 9403074521, अक्षय मोहीते 7276277575, 9922570399 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन अध्यक्ष संताजी रावराणे यांनी केले आहे. तसेच शिवजयंती उत्सवानिमित्त १९ रोजी सकाळी ११ वाजता भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.



