Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासाटेली येथे २१ तारखेला खुल्या अभंग स्पर्धेचे आयोजन...

साटेली येथे २१ तारखेला खुल्या अभंग स्पर्धेचे आयोजन…

सावंतवाडी.ता,१७: साटेली तर्फ सातार्डा येथील श्री देवी माऊली कला मंच व साटेली ग्रामस्थांच्यावतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून खुल्या संत रचित अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक २१ फेब्रुवारीला सायंकाळी साडे पाच वाजता येथील माऊली मंदिर परिसरात होणार आहे.

या स्पर्धे साठी खुल्यागटासाठी प्रथम पारितोषिक ३५५५, द्वितीय पारितोषिक २५५५ व तृतीय पारितोषिक १५५५ असे ठेवण्यात आले आहेत.तर स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळण्यासाठी अनुक्रमे १०००,७०० व ५०० अशी तीन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धकाने आपली नावे सत्यनारायण करंगुटकर ८९७५१९८९७९ संतोष कुबल ७७९८६७२५१९ यांच्याकडे नोंदवावीत.अभंग गायनाची वेळ सात मिनिटाची असणार आहे, गायकाने कोणते वाद्य न वाजवता गायन करावे, संगीत सात आयोजकांची राहील,अभंग संतरचित असावा, सिनेमा आधारित चाली नसाव्यात असा नियम ठेवण्यात आला आहे.या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments