सिंधुदुर्गनगरी ता.१७:
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी दुपारी दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत असून सायंकाळी 5 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. मात्र या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पाश्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यातील पत्रकारांना विशेष पास दिले आहेत. परंतु बैठक सभागृहात प्रवेश नाही. पत्रकार परिषद नाही, तर पत्रकारांना देण्यात आलेल्या पासाचा उपयोग काय ? असा प्रश्न पत्रकारांना पडला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह मंत्री सुभाष देसाई, उदय सामंत, अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता हे जिल्ह्यात येत असून यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा होणार आहे. कोकणवर विशेष प्रेम असणाऱ्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते स्वतः उपस्थित राहत असल्याने जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. जिल्ह्याला स्वतंत्र पॅकेज मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आढावा बैठकीत काय चर्चा होते ? हे समजन्यासाठी पत्रकारांना बैठक सभागृहात प्रवेश अपेक्षित आहे. माहिती कार्यालय याची बातमी काढणार असले तरी ती शासकीय भाषेत असणार आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समजण्यासाठी पत्रकारांना बैठक सभागृहात प्रवेश द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील पत्रकारांकडून होत आहे. तसेच प्रवेश नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पत्रकारांना ‘नो इंट्री’…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES