केंद्रप्रमुख हेमंत साटम यांची माहिती…
मालवण, ता १७ : फेब्रुवारी २०२० ची इयत्ता बारावीच्या परीक्षेची मालवण केंद्राची बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रप्रमुख हेमंत साटम यांनी दिली.
बारावीच्या परीक्षेस उद्यापासून सुरवात होत आहे. यात परीक्षार्थींची बैठक व्यवस्था स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व टोपीवाला हायस्कूल मालवण येथे करण्यात आली आहे. बारावी विज्ञान व कला शाखेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी व मराठी विषयाच्या पेपरची बैठक व्यवस्था टोपीवाला हायस्कूल येथे करण्यात आली आहे तसेच वाणिज्य व किमान कौशल्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या मराठी व इंग्रजी या विषयांचे पेपर स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे होतील. २६ तारखेला होणाऱ्या वाणिज्य शाखेच्या वाणिज्य संघटन विषयाच्या पेपरसाठी बैठक व्यवस्था टोपीवाला हायस्कूल येथे करण्यात आली आहे. बाकी सर्व शाखेतील उर्वरित सर्व विषयांची बैठक व्यवस्था स. का. पाटील महाविद्यालय येथे करण्यात आली आहे याची मालवण केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन केंद्रप्रमुख श्री. साटम यांनी केले आहे.