उध्दव ठाकरेंचे आश्वासन; डॉक्टर संघटनांच्या पदाधिकार्यांनी घेतली भेट…
सिंधुदुर्गनगरी ता.१८: ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही,याची काळजी घेवू,असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील डॉक्टर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले.आपल्या विविध प्रश्नांसंदर्भात लक्ष वेधण्यासाठी काल येथील दौऱ्यात जिल्ह्यातील डॉक्टरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी
डाॅ.जयेंद्र परूळेकर,डाॅ.संजीव आकेरकर,डाॅ.संजय केसरे,डाॅ.संजय सावंत,डाॅ.नवांगुळ,डाॅ.विद्याधर तायशेट्ये,डाॅ पाताडे,डाॅ.कोलते,डाॅ.पावसकर व इतर अनेक डाॅक्टर्स उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील डाॅक्टर संघटनांतर्फे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.डाॅक्टरांच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री महोदयांनी डाॅक्टरांना आश्वासन दिले आहे.हाॅस्पिटल व क्लिनीक संदर्भातील प्रदूषण नियामक मंडळाच्या तसेच कामगार कायद्यांतर्गत जाचक अटी व नियम त्याच बरोबर डाॅक्टरांची सुरक्षा या संदर्भात डाॅक्टर संघटनांतर्फे मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले.