सह्याद्री फाऊंडेशन आयोजित सुदृढ बालक स्पर्धेचा निकाल जाहीर…

2

सावंतवाडी.ता,१८:  सह्याद्री फाऊंडेशनच्या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत घेऊन बालकांचे आरोग्य सुदृढ बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे.या माध्यमातून भावीपिढी आदर्श बनण्याचा हा पाया आहे.असे मत सभापती मानसी धुरी यांनी व्यक्त केले.या स्पर्धेत मिहिरा तुकाराम परब, प्रज्वल महेंद्र धुरी,आर्वी मनीष गावडे यांनी एक नंबर सुदृढ म्हणून मान मिळवला.तीन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. सह्याद्री फाऊंडेशन भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय नगरपालिका आंबोली सैनिक स्कूल बेबी वर्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी बॅ.नाथ पै सभागृहात रविवारी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेचे उद्घाटन सभापती धुरी यांनी केले.
यावेळी गटविकास अधिकारी गजानन भोसले, अॅड .दिलीप नार्वेकर,बाळासाहेब बोर्डेकर,उमाकांत वारंग,सुनील राऊळ आदी उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभ नगराध्यक्ष संजू परब,सुनील राऊळ,विजय चव्हाण,अॅड.संतोष सावंत,बाळासाहेब बोर्डेकर, प्रल्हाद तावडे,सुहास सावंत,रवींद्र मडगावकर,शशिकांत मोरजकर विभावरी सुखी,मोहिनी मडगावकर,राजू बेग आदी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षक वैभव खानोलकर,शंकर बिद्रे, डॉ.विशाल पाटील, डॉ.अश्विनी सिंग, डॉ.प्रमोद राठोड, सोमिया फर्नांडिस,शिवानी मलुष्टे,वर्षा भिवरे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी नूतन अध्यक्ष प्रल्हाद तावडे व सचिव सुहास सावंत यांचाही गौरव करण्यात आला प्रथम गटात मीहिरा परब,द्वितीय गिया कुडाळकर, तृतीय इथन डान्टस,दुसऱ्या गटात प्रज्वल धुरी, परिधी रायका यशवंती सावंत पहिले तीन क्रमांक पटकावले. तिसर्‍या गटात आर्वी गावडे, साईराज तोरस्कर,आरोही अरवारी यांना रोख रक्कम पारितोषिक व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावडे यांनी तर आभार रवींद्र मडगावकर यांनी मानले.

3

4